निवडणुकीसाठी प्रचारसभांचा जोर वाढू लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघात महायुतीचे निलेश राणे (Nilesh Rane) तर महाविकास आघाडीचे वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यात मुख्य लढत होणार आहे. निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. साधं एमबीए देणारे इन्स्टिट्यूट आपल्याकडे नाहीत, यासाठी दानत असावी लागते, खोटे पक्षप्रवेश आम्ही करून घेत नाही, अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी वैभव नाईक यांच्यावर कुडाळ येथील आयोजित सभेत केली.
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईकरांचे लक्ष माहीम, वरळीकडेच! कुणाचा गड येणार, कुणाचा सिंह जाणार?)
निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “नारायण राणे यांनी विधिमंडळात अनेक भाषणं केली, त्याचा प्रभाव आजही माझ्यावर आहे. राणे साहेबांनी विधिमंडळ हलवून सोडलं. त्यांची अभ्यासपूर्ण भाषण होती. या उलट या वैभव नाईक याने विधिमंडळात एक जरी भाषण केलं असेल तरी मला दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी नाईक यांना दिलं. २००९ पासून माझी सभागृहात जायची इच्छा होती. कुडाळ मालवणचा विकास रखडला आहे. मच्छीमारांचे प्रश्न अनेक आहेत. पर्यटन, रोजगार हे प्रश्न आहेत. या आमदार वैभव नाईक यांनी काहीच केलं नाही.”
(हेही वाचा-Sheetal Mhatre: महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा; शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल)
“राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे मेडिकल कॉलेज सुरू केलं आणि त्याला विरोध म्हणून ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले, पण शासकीय महाविद्यालयाची आज अवस्था काय आहे पहा. त्यामध्ये जनावर सुद्धा शिकू शकत नाही.” अशा शब्दात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली.
पुढे बोलताना ते (Nilesh Rane) म्हणाले, “मला रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीच राज्यसभा विधानपरिषदेमध्ये जाणार का असे विचारलं होतं पण मी नम्रपणे ते नाही सांगितलं. ज्या ठिकाणी साहेब पडले त्याच ठिकाणी मला निवडून यायचं आहे. आणि काम करून दाखवायचं आहे. आणि येत्या पंधरा दिवसात येथील जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून येणार.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी माझ्यामागून आलेले अनेक जण मंत्री झाले, मी अजून दाढी किती पिकवायची? असा सवाल विचारला. ज्या ठिकाणी माझ्या साहेबांचा पराभव झाला, त्याच ठिकाणी मला लोकांची सेवा करायची आहे. यासाठी मला संधी द्या. मला याच ठिकाणाहून निवडून यायचं आहे. येथील जनतेचा शैक्षणिक, आरोग्य, रोजगार असा लोकाभिमुख विकास करायचा आहे यासाठी मला संधी द्या, असे निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community