Nilesh Rane २३ ऑक्टोबरला करणार शिवसेनेत प्रवेश

73
Nilesh Rane २३ ऑक्टोबरला करणार शिवसेनेत प्रवेश
Nilesh Rane २३ ऑक्टोबरला करणार शिवसेनेत प्रवेश

भाजप नेते निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून रंगत होती. त्यात दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत राणे हाती शिवबंधन बांधणार आहेत. दि. २२ ऑक्टोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी ही माहिती दिली. (Nilesh Rane)

( हेही वाचा : Assembly Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त

निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याने राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुडाळ विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे वैभव नाईक यांना राणेंच्या उमेदवारीने आव्हान उभे राहणार आहेत. (Nilesh Rane)

यावेळी राणे म्हणाले की, २०१९ ला राणे साहेब, नितेश राणे आणि आमच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आम्ही भाजपामध्ये आलो. भाजपाने याकाळात सन्मानाची, प्रेमाची वागणूक मिळाली. यावेळी पक्षाची शिस्त जवळून अनुभवता आली. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावासारखे मला सांभाळून घेतले. त्यामुळे पक्षातील सर्वच नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. (Nilesh Rane)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.