भाजपाचं पीक जोमात पण कीडही लागते, फवारणी करावी लागेल: Nitin Gadkari असं का म्हणाले?

77
भाजपाचं पीक जोमात पण कीडही लागते, फवारणी करावी लागेल: Nitin Gadkari असं का म्हणाले?
भाजपाचं पीक जोमात पण कीडही लागते, फवारणी करावी लागेल: Nitin Gadkari असं का म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. विधानसभा निवडणुकांच्या (Maharashatra Election 2024) पार्श्वभुमीवर भाजपमधील (BJP) वाढते इनकमिंग या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. “भाजपा ही कॅडर बेस ऑर्गनायजशेन विथ मास फॉलोइंग या कॅटेगरीत आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नवीन कार्यकर्ते, नेते विविध कारणांनी पक्षात येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचाराधारा शिकवणे आणि त्यांना कार्यकर्ता म्हणून तयार करणे ही आमची जवाबदारी आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे. हजारो कार्यकर्ते कष्ट घेत आहेत. पण एका कार्यकर्त्याचे चुकीचे वर्तन, चुकीची माहिती सर्व प्रयत्नांवर पाणी फेरते.” असे स्पष्ट मत गडकरी यांनी मांडले. (Nitin Gadkari)

(हेही वाचा-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना काँग्रेसचा पुळका! संविधानाच्या लाल रंगावरून भाजपाला प्रतिप्रश्न)

पुढे बोलताना ते (Nitin Gadkari) म्हणाले, “विचारभिन्नता समस्या नाही तर विचारशून्यता ही समस्या आहे. पॉलिटिक्स ऑफ कन्विनियन्स नव्हे तर पॉलिटीक्स ऑफ कन्विक्शन महत्त्वाचं आहे. आता बहुसंख्य लोक राजकारणात काम करतात. त्यांचं एकच असतं मला तिकीट द्या, मला मंत्री करा, मला सत्ता द्या. याऐवजी मला समाजाचं देशाचं भलं करायचंय असं म्हणणारा कार्यकर्ता ही पक्षाची ताकद असते.”

(हेही वाचा-Jammu and Kashmir मध्ये लष्कराने केला एका दहशतवाद्याचा खात्मा!)

“हायब्रीड बियाणं लावलं की जेवढं पीक वाढतं तेवढं रोग जास्त येतात. त्यावर फवारणी करावी लागते. भाजपचं पीक सध्या खूप आलंय, चांगले दाणेही आहेत. पण रोगराईसुद्धा पसरते. त्यावर फवारणी करावी लागते. ते मारायचं काम आम्ही केलं पाहिजे. पीक वाचवलं पाहिजे. चांगला सदृढ, वैचारिक प्रगल्भ असा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने तयार व्हायला पाहिजे.” असं म्हणत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पक्षातंर्गत सर्जिकल स्ट्राईकचा बॉम्ब टाकला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.