वरळीत विकासकामे झालेली नाहीत; Amit Thackeray यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

40
वरळीत विकासकामे झालेली नाहीत; Amit Thackeray यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
वरळीत विकासकामे झालेली नाहीत; Amit Thackeray यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

अमित ठाकरे यांनी वरळी (Worli) विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर विकासकामावरून टीका केली. वरळीत विकासकामे झालेली नाहीत. तिथले आमदार लोकांसाठी उपलब्ध नव्हते. लोकांना त्यांची भेट घेता येत नव्हती. लोकप्रतिनिधी असताना लोकांसाठी उपलब्ध असायला हवे. पण ते झाले नाही. तिथले आमदार लोकांसाठी उपलब्ध नसल्यामुळेच आम्हाला उमेदवार द्यावा लागला. संदीप देशपांडे यांचे काम उत्तम आहे. ते वरळी मतदारसंघातून नक्कीच जिंकतील, अशा शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचा – Halal Mukt Diwali Abhiyan : राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान! – हिंदु जनजागृती समिती)

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. तर 4 नोव्हेबरपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर अमित ठाकरे देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या राजकीय स्पर्धेनंतर आता आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे यांच्यातील लढत आता प्रत्यक्ष समोरासमोर होणार आहे.

अमित ठाकरे (Amit Thackeray) पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत पर्यावरण खात्याने मुंबईत काहीच काम केले नाही. आरेच्या प्रकल्पातही त्यांनी 30-35 हजार झाडे कापून घेतली. मी पर्यावरणासाठी काम करतच राहणार असल्याचेही अमित ठाकरे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.