Mira-Bhayandar मतदारसंघातून उमेदवारी द्या; खुश खंडेलवाल यांची भाजपाकडे मागणी

550
Mira-Bhayandar मतदारसंघातून उमेदवारी द्या; खुश खंडेलवाल यांची भाजपकडे मागणी
Mira-Bhayandar मतदारसंघातून उमेदवारी द्या; खुश खंडेलवाल यांची भाजपकडे मागणी

‘हिंदू टास्क फोर्स’चे अध्यक्ष अ‍ॅड. खुश खंडेलवाल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मीरा-भाईंदर मतदारसंघातून (Mira-Bhayandar) भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आजी-माजी आमदारांमधील गंभीर वादाचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून मला उमेदवारी द्यावी, असे खंडेलवाल यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा – सीमेवर शांतता राखणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे; पंतप्रधान Narendra Modi यांचा ब्रिक्स परिषदेत संदेश)

मीरा-भाईंदरचे सर्व नेते निवडणुकीपुरते हिंदू असतात. ते निवडणुका झाल्या की, पुन्हा धर्मनिरपेक्ष होतात. २०२३ मध्ये नयानगर येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या हिंदू युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्या युवकांना मी निःशुल्क कायदेशीर मदत केली होती. मीरा-भाईंदरचे सर्व नेते त्या वेळी गायब होते, असे खुश खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

लँड जिहादविरुद्ध कायदेशीर लढ्यामुळे लोकांचा पाठिंबा

मी गेल्या अनेक वर्षांपासून मीरा-भाईंदरमध्ये निर्भयपणे आणि निःस्वार्थपणे हिंदुत्वासाठीचे उपक्रम राबवत आहे. विशेषतः लँड जिहादविरुद्ध माझा लढा चालू आहे. या कारणास्तव मला हिंदुत्ववादी लोकांचा चांगला पाठिंबा आहे. मीरा-भायंदरमध्ये वेगाने होत असलेल्यालोकसंख्याशास्त्रीय बदलाबाबत स्थानिक नेत्यांना अजिबात चिंता नाही. येथील हिंदू समाजात मीरा-भाईंदरच्या स्थानिक नेत्यांबद्दल खूप नाराजी आहे; कारण हे सर्व नेते निवडणुका आल्यावरच हिंदू बनतात, उर्वरित 5 वर्षे डाव्या पक्षांप्रमाणेच धर्मनिरपेक्ष राहतात. याशिवाय विद्यमान विधिमंडळ आणि माजी आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत, त्यामुळे यापैकी कोणत्याही नेत्याला तिकीट मिळाल्यास भाजपला या जागेवर पराभव पत्करावा लागणे स्वाभाविक आहे. भाजप हा देशातील एक प्रखर हिंदूवादी पक्ष आहे, ज्यामध्ये देशभक्ती आणि हिंदुत्वाला या पक्षाचे प्राधान्य आहे, त्यामुळे माझ्या प्रखर हिंदूवादी प्रतिमेमुळे तुम्ही मला मीरा-भायंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची संधी द्याल, अशी मला आशा आहे, असे अ‍ॅड. खुश खंडेलवाल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये (Mira-Bhayandar) उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून निवडणूक लढवण्यास आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता व अॅड. रवी व्यास यांच्यात रस्सीखेच आहे. दुसरीकडे शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. त्याचबरोबर अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शासनाच्या नगरविकास विभागातील निवृत्त अधिकारी दिलीप घेवारे यांना भाजपमधून उमेदवारी देण्याची चर्चा सरू झाली आहे.

दिलीप घेवारे हे मीरा-भाईंदर शहरात अनेक वर्षे पालिकेच्या नगररचना विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते विशेष कार्य अधिकारी म्हणून महापालिकेत मानधनावर आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.