Raj Thackeray: “शरद पवार तालुक्याचे नेते”, राज ठाकरेंनी साधला निशाणा

103
Raj Thackeray:
Raj Thackeray: "शरद पवार तालुक्याचे नेते", राज ठाकरेंनी साधला निशाणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकल आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लातूरच्या रेणापूरमध्ये बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याकडे पाहिलं पाहिजे. शरद पवार (Sharad Pawar) तीनदा मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषी मंत्री झाले. एकदा बारामती तालुक्यात जाऊन पाहा. जेवढे उद्योग धंदे आले ते मराठवाड्यात आणता आले नसते. विदर्भात आणता आले नसते. इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. हे महाराष्ट्राचे नेते कसे होऊ शकतात. हे तर तालुक्याचे नेते आहेत. असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

(हेही वाचा-US Election Results: २७७ बहुमताचा आकडा गाठत Donald Trump ठरले अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष)

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “१९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाला. तो जन्म झाल्यावर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा. लोकांना बाहेर कसं आणायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं. प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो. जातीबद्दल प्रेम असणं वावगं नाही. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे. नेमक्या याच गोष्टी या लोकांनी केल्या. तुमची माथी भडकावली. आपण मूळ विषयाकडे जायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या करतो कुणाचं लक्ष नाही. रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे. कुणाचं लक्ष नाही. तरुण शेती सोडून शहरात जातो. कुणाचं लक्ष नाही. कृषी विद्यापीठ ओस पडले. त्याकडे कुणाचं लक्ष नाही.”

(हेही वाचा-Ajit Pawar Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहे वेगळेपण?)

“राज्यात लहान मुलींवरील बलात्काराचं प्रमाण वाढलं. तरुण मुली आणि महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलं. असा नव्हता महाराष्ट्र. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न आहे. विहिरीला पाणी लागत नाही. कुठून शेती करणार आहे. कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून यासाठी म्हणून जातीपातीचा विषय तुमच्यासमोर आला. भांडा. बसा वाद घालत. बसा द्वेष पसरवत. त्यातून काही हाताला लागणार नाही. मूळ विषयाला लक्ष न दिल्याने त्यातून काही हाती लागणार नाही. मी तुम्हाला विश्वास देतो, या सर्व गोष्टी सहज शक्य आहे. नक्की होऊ शकतात. फक्त त्यासाठी इच्छा शक्ती हवी. ती माझ्याकडे आहे. तुडूंब भरलेली आहे. माझा प्रत्येक उमेदवार ही महाराष्ट्राची येणारी ताकद आहे. या राज्यात सत्ता आणायची असेल तर प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. उमेदवार महत्त्वाचा आहे.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा-Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात नेमकं काय?)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात निवडणूक लढवू. नंतर म्हणतात नाही लढणार. पाडणार. तुम्हाला लढायचं तर लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो. मी जरांगे पाटलांना भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर मांडली. हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. महाराष्ट्रासाठी असं धोरण आखायला गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील. ते कुणालाही परवडणार नाही. हे होणार नाही हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना माहीत आहे. आरक्षण देणार जे सांगतात त्यांना विचारा आरक्षण कसं देणार.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.