Sada Saravankar माहीममधून कोणती भूमिका घेणार ?; पत्रकार परिषद घेऊन म्हणाले…

180
Sada Saravankar माहीममधून कोणती भूमिका घेणार ?; पत्रकार परिषद घेऊन म्हणाले...
Sada Saravankar माहीममधून कोणती भूमिका घेणार ?; पत्रकार परिषद घेऊन म्हणाले...

गेली अनेक वर्षे जे शिवसैनिक संकटांना तोंड देऊन उभे आहेत, त्यांची भावना लक्षात घेणे आवश्यक आहे. शिंदेसाहेबांनी मला कार्यकर्त्यांशी बोलून ठरवा, असे मला सांगितले होते. माझे ५० गट प्रचार करत आहेत. मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची. राज्याचे मुख्यमंत्री पुनश्च एकनाथ शिंदे (Eknath Shinde) निवडून यावे, हीच आमची निवडणुकीला उभे रहाण्यामागची भूमिका आहे. त्यामुळे मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका ठरवणार आहे, असे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माहीममधील उमेदवार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे प्रथमच उभे असल्यामुळे शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशी भूमिका मांडली जात आहे.

(हेही वाचा – मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, Chhagan Bhujbal काय म्हणाले ?)

मनसेने महायुतीविरोधातील सर्व उमेदवार मागे घ्यावेत, तर मी माहीममधून माझा अर्ज मागे घेईन, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. एका सीटमुळे वातावरण खराब व्हावे, असे वाटत नाही. राजसाहेब ठाकरे यांच्याविषयीही आमच्या मनात प्रेम आहे. हा त्याग आहे, त्याचा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होण्यासाठी लाभ व्हावा. महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार, असे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.

सदा सरवणकर कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी आवर्जुन सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.