माहिममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावरुन Sada Saravankar नेमकं काय म्हणाले?

172
माहिममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावरुन Sada Saravankar नेमकं काय म्हणाले?
माहिममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावरुन Sada Saravankar नेमकं काय म्हणाले?

माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. शिवसेनेकडून सदा सरवणकर (Sada Saravankar), उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत तर मनसेकडून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला आहे.

(हेही वाचा-)Maharashtra Assembly Poll : दिंडोशीत शिवसेना विरुद्ध शिवसेना!

या संपूर्ण प्रकरणावर आता आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदा सरवणकर म्हणाले, “आशिष शेलार आणि राज साहेबांची एक चांगली मैत्री आहे. आता मैत्रीसाठी त्यांनी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी सोमवारी जाऊन अर्ज भरणार आहे. केसरकर साहेब मी कधीकधी भेटत असतो. एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) माझा विश्वास आहे. त्यांनी एबी फॉर्म दिलाय. निवडणूक अर्ज भरू नका म्हणून माझ्यासाठी एकही फोन नाही. मला कोणाचीही अद्याप विनंती नाही.” असंही सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं. (Sada Saravankar)

(हेही वाचा-UBT मध्ये ‘या’ दोन नेत्यांनी उपसले बंडाचे निशाण)

पुढे बोलताना सदा सरवणकर म्हणाले, मी लढणारा शिवसैनिक आहे. मी मागच्या दरवाज्याने येणार नाही. माझ्यावर कोणताच प्रेशर नाही. मी लोकांना सहज भेटणारा लोकप्रतिनिधी आहे. मी 30 वर्ष केलेलं काम हे विजयी करण्यासाठी भरपूर आहे. माझ्या विभागात शिवसेना मोठी झाली पाहिजे. मी जनतेचा आशिर्वाद घेणार आहे. शेलार माझे चांगले मित्र आहेत, राज ठाकरेंचीही मित्र आहेत. मात्र युतीधर्म आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर पुर्ण विश्वास टाकलाय. ते नक्की विचार करतील. संघर्षातून आम्ही शिवसेना उभी केली आहे. मी निवडणूक लढवणार आणि माघार घेणार नाही.” अशी माहिती सरवणकर यांनी दिली. (Sada Saravankar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.