“तुम्हीच सांगा मी लढलो तर मी जिंकेन की हरेन?”, Sada Sarvankar यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

78
"तुम्हीच सांगा मी लढलो तर मी जिंकेन की हरेन?", Sada Sarvankar यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

माहीम विधानसभा मतदारसंघातील लढत हायव्होल्टेज ठरत आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासाठी सदा सरवणकर (Sada Sarvankar ) यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीतील नेते मनधरणी करत आहेत. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सदा सरवणकर (Sada Sarvankar ) आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Bandra Stampede: वांद्रे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य-पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय; ‘या’ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही)

या बैठकीत सदा सरवणकर (Sada Sarvankar ) यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर झाल्याचे सांगितले जाते. सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना विचारले की, ‘मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा, मी निवडणूक लढवली तर मी जिंकेन की हरेन? मी गेली 30 वर्षे माहीम भागाचे लोकप्रतिनिधित्त्व करत आहे.’ सदा सरवणकरांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) निरुत्तर झाले.

(हेही वाचा-Air Pollution : देशातील 11 शहरांतील प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी)

राज ठाकरे यांना आपल्या मुलाला माहीम विधानसभेतून रिंगणात उतरवायचे होते तर तशी चर्चा आधी करायला पाहिजे होती. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चा करणे निरर्थक आहे, असे सदा सरवणकर यांचे म्हणणे आहे. आम्ही निवडणुकीसाठी पत्रकं छापलेत, झेंडे घेतलेत. गटप्रमुख, बुथप्रमखांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ऐनवेळी माघार घेणे शक्य नाही. अन्यथा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा फटका बसेल, असे सदा सरवणकर (Sada Sarvankar ) यांनी म्हटलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.