माहीम विधानसभा मतदारसंघातील लढत हायव्होल्टेज ठरत आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासाठी सदा सरवणकर (Sada Sarvankar ) यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीतील नेते मनधरणी करत आहेत. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला होता.
(हेही वाचा-वरळीत विकासकामे झालेली नाहीत; Amit Thackeray यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सदा सरवणकर (Sada Sarvankar ) आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यातील काही मतदारसंघात भाजपा आणि मनसेत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे माहिममधून सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
चला होऊया ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार 🏹
चला फॉर्म भरायला 🏹
सोमवार, दि. २९/१०/२०२४,
सकाळी ठीक ९.०० वाजता.ठिकाण :- शाखा क्र.१९४, सामना प्रेस जवळ,
न्यू प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई :- ४०० ०२५.#shivsena #शिवसेना#sadasarvanakar #सदा_सरवणकर #सदा_सर्वदा#माहीम_विधानसभा… pic.twitter.com/KYAk2adbYY— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 28, 2024
यासंदर्भात सदा सरवणकर (Sada Sarvankar ) यांनी सोशल मिडीया पोस्ट करत निवडणूक अर्ज भरण्यावर शिक्कामोर्तब केली आहे. उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरायला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community