शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी

130
शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी
शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी

कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत व्यक्तिगत पातळीवर केलेल्या वक्तव्यांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राज्यभरातून अनेकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. त्यामुळे नरमलेले सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याबाबत जाहीर माफी मागितली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवारी, आवाहन मात्र तुतारीला मत देण्याचे; नेमके काय घडले ?)

सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. खोत म्हणाले की, “मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे. कारण एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल, तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो. गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते,” असेही खोत यांनी सांगितले.

शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आला होता. त्यानंतर ही स्थिती लक्षात घेता सदाभाऊ खोत पुण्यातील पत्रकार परिषदेला येणार नाहीत‌. ते इस्लामपूरमधील त्यांच्या घरीच थांबणार आहेत. दुरीकडे सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथे खोत यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.