शरद पवारांनी सांगितला MVA चा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला; म्हणाले…

126
शरद पवारांनी सांगितला MVA चा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला; म्हणाले...
शरद पवारांनी सांगितला MVA चा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला; म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जवळ येत असताना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय हालचाली गती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून संकेत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीत देखील मुख्यमंत्रिपदावर चर्चा अधिकच रंगली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) एका मुलाखतीत ज्याच्याकडे आमदारांची संख्या अधिक असेल, त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल असे विधान करून आघाडीत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

(हेही वाचा – नेपाळचे नवे पंतप्रधान KP Sharma Oli यांना चीनच जवळचा; भारताआधी जाणार चीनच्या दौर्‍यावर)

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच, जास्त जागा असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांना वाटते की, या फॉर्म्युल्यामुळे पाडापाडीला प्रोत्साहन मिळू शकते आणि त्यामुळेच आघाडीतील एकी धोक्यात येऊ शकते. ठाकरे म्हणाले होते की, मित्रपक्षच एकमेकांचे उमेदवार पराभूत करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आघाडीची शक्ती कमी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress) १०१ जागांवर, उद्धव ठाकरेंचा पक्ष (UBT) ९३ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस ८६ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काँग्रेस हा मोठा भाऊ आहे. पवारांच्या या फॉर्म्युलामुळे आता आघाडीतला मुख्यमंत्री कोण असेल यावर पुनर्विचार होऊ शकतो. मात्र पवार यांच्या मतानुसार काँग्रेसचा दावा सर्वात मजबूत ठरतो.

या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मांडलेल्या फॉर्म्युलावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय असेल याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीत (MVA) एकमत होईल का, किंवा मुख्यमंत्रिपदावर अद्याप काही नवा तोडगा निघेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.