लाडक्या बहिणींना 2100, शेतकरी कर्जमाफी, विशेष AI विद्यापिठाची स्थापना; BJP Manifesto प्रसिद्ध

98
लाडक्या बहिणींना 2100, शेतकरी कर्जमाफी, विशेष AI विद्यापिठाची स्थापना; BJP Manifesto प्रसिद्ध
लाडक्या बहिणींना 2100, शेतकरी कर्जमाफी, विशेष AI विद्यापिठाची स्थापना; BJP Manifesto प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडक्या बहिणींना 2100, शेतकरी कर्जमाफी, २५ लाख रोजगार निर्मिती, वयोवृद्धांना पेन्शन अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. (BJP Manifesto)

(हेही वाचा – Accident News: रत्नागिरीमध्ये भीषण अपघात; एसटी, कार, ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक!)

दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावेळी भाजपाचे नेते अमित शाह, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वाखालील 18 विभागप्रमुखांच्या समितीने भाजपचे हे संकल्पपत्र (BJP election manifesto 2024) तयार केले आहे. जो संकल्प करतोय, तो महाराष्ट्रच्या प्रगतीचा विकासाचा आणि छत्रपतींच्या रयतेचा आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न सहा हजार रुपयांनी कमी झाले होते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपच्या जाहीरनाम्यात काय आहे ?
  • लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देणार
  • महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
  • महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,००० होणार
  • एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबवणार
  • प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.
  • वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देणार
  • येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल.
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.
  • वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.
  • सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत’ व्हिजन महाराष्ट्र @ २०२९० सादर करण्यात येईल.
  • सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य ठेवले आहे.
  • 11 महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण (Innovation) संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी खालील पावलं उचलण्यात येतील
  • ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल.
  • महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) राजधानी बनविण्यात येईल.
  • जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल.
  • सोबतच AI संशोधन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.
  • नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल.

असे अनेक संकल्प यामध्ये करण्यात आले आहेत. (BJP Manifesto)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.