कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर Sudhir Mungantivar यांची टीका!

118

राज्यात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly 2024) रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीने रविवार १० नोव्हेंबर रोजी जाहीरनामा प्रसिद्ध झाला. मविआने आपल्या जाहीरनाम्यात १०० दिवसांचा अजेंडा जाहीर केला. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत ( Congress Manifesto) भाजपाचे नेते सुधीर मनगुंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार आता नाही, असे विधान मुनगंटीवार यांनी केले. (Sudhir Mungantivar)

(हेही वाचा – Rahul Gandhi अपरिपक्व; काँग्रेसला पुढे नेऊ शकत नाही; Kiren Rijiju यांची टीका)

पत्रकार परिषद घेत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीचा जाहीरनामा आमची नक्कल आहे. आमच्या कम्प्युटरमध्ये त्यांनी टाईप केलेला दिसत आहे. त्यांची कॉपी पेस्ट करायची सवय आहे. त्यांचा खोटारडेपणा खुर्चीत येऊन थांबतो. त्यांचे शिक्षक पश्चाताप करत असतील, त्यांना आम्ही चुकीचे शिकवले का? असा प्रश्न त्यांच्या शिक्षकांना पडत असेल. ‘बटेंगे तो कटेंगे’ (Batenge to katenge) सर्व जाती व धर्मांनी एकत्र राहण्यास आम्ही सांगत आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) विश्वास आहे प्रेम आहे ते कॉंग्रेससोबत राहुच शकत नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कॉंग्रेस काळात जाहीरनामा म्हणजे धूळ खात पडलेला कागद होता. आमचे संकल्प पत्र हे महाराष्ट्राचा १ ट्रीलियन डॉलरच्या दिशेने जाणारी अर्थव्यवस्थेचे स्वरूप आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.