उबाठाचे उमेदवार Sunil Raut यांना महिलेविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल

65
उबाठाचे उमेदवार Sunil Raut यांना महिलेविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल
उबाठाचे उमेदवार Sunil Raut यांना महिलेविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल

विक्रोळी विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे (Suvarna Karanje) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे उबाठाचे उमेदवार सुनील राऊत (Sunil Raut) यांना भोवले आहे. सुनील राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील राऊत हे उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत.

(हेही वाचा – महायुतीच्या प्रचारसभांचा नारळ कोल्हापुरात फुटणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis ६ दिवसात घेणार २१ सभा)

काय आहे प्रकरण ?

कार्यकर्त्यांना हिंदीमध्ये संबोधित करताना सुनील राऊत म्हणाले होते की, ‘जब बकरा बनाना ही था, तो बकरी को मेरे गले मे डाल दी, अभी 20 तारीख को काटेंगे बकरी को’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या विक्रोळी पोलिसांनी करंजे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विक्रोळी पोलीस करीत आहेत. विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत हे दोनदा आमदार झाले असून तिसऱ्यांदा ते निवडणुकीसाठी उभे आहेत.

विक्रोळी (Vikhroli) पोलीस ठाण्यात या बाबत कलम 79, 351(2), 356(2) बीएनएस अंतर्गत रात्री उशिरा सुवर्णा करंजे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑक्टोंबर रोजी सुनील राऊत (Sunil Raut) यांनी टागोरनगर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार करंजे यांच्या बद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.