काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जाहीर सभांमध्ये बोलताना लाल रंगाचे संविधान (Constitution) दाखवले. या संविधानाच्या लाल रंगावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली. संविधानाचा रंग लाल का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. यावर आता उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिप्रश्न केला आहे.
(हेही वाचा-सोलापुरात Congress ला धक्का; 5 माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश)
परभणीच्या सभेत शनिवारी (९ नोव्हें.) बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “राज्याच्या निवडणुकीत देशाचा पंतप्रधान एका फडतूस पक्षाच्या प्रचाराला येऊ कसा शकतो. ते सांगत आहेत काँग्रेसला संविधान बदलायचे आहे. मात्र संविधान हा केंद्राचा विषय आहे. राज्याच्या निवडणुकीत त्याचा काय संबंध? मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही. मात्र त्या लाल संविधानामध्ये कोरी पानं होती, हे तुम्हाला कसं माहित?” असा प्रतिप्रश्न ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला.
(हेही वाचा-मविआ म्हणजे ‘मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट’; Smriti Irani यांचा हल्लाबोल)
पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि मिंदे यांना नाही. मोदीजी तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही माझ्यापासून निवडून नागरिकांना तोडू शकत नाही. महायुती म्हणजे महाराष्ट्राची अधोगती गुजरातची प्रगती. सगळं काही गुजरातला नेत आहेत. काल परवापासून मोदी, शाह महाराष्ट्रात येत आहेत. आता सत्ता आली नाही तर महाराष्ट्र हातातून गेलाच समजा.” (Uddhav Thackeray)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election : सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत, महायुती किती गड राखणार?)
“तुम्ही म्हणता की, सुप्रिया ताईला मुख्यमंत्री करायचं, पण तुम्हाला देशाला काय करायचं सांगा. मी अमित शाह यांना आव्हान देतो, तुमचा मुलगा जो आहे जय शहा, त्याने क्रिकेट खेळून दाखवावं. मोदी शाह इथे प्रचार करत असताना तिकडे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत होते. तेथे अत्याचार होत असलेली ती यांची लाडकी बहीण नव्हती का? मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार आहे? मोदी, शाह तुम्ही आधी राजीनामे द्या, नंतर स्टार प्रचारक व्हा. अनेक भाजप नेते खाजगी सांगतात या दोघांनी आमचा पक्ष संपवला. कोरोना आणि संकट काळात मोदी राज्यात आले नाही, गुजरातला गेले होते. त्यांना यायची गरजही नव्हती तेव्हा आपलं सरकार होतं. आपण कधी केंद्रासमोर हात पसरले नाही. लाडकी बहिण योजनेसारखा आम्ही कधी प्रचार केला नव्हता. आमच्या सरकार आल्यास पुन्हा कर्जमुक्ती करू.” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community