‘भारत जोडो’च्या माध्यमातून अर्बन नक्षलवाद; Devendra Fadnavis यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार

67
'भारत जोडो'च्या माध्यमातून अर्बन नक्षलवाद; Devendra Fadnavis यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
'भारत जोडो'च्या माध्यमातून अर्बन नक्षलवाद; Devendra Fadnavis यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार

‘भारत जोडा’ असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पहाता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी ? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत ? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद (Urban Naxalism) यापेक्षा वेगळा नाही. देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल, हेच काम यामधून होत आहे, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

(हेही वाचा – Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात नेमकं काय?)

राहुल गांधी 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो (bharat jodo yatra) यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.