Wadala Assembly : सन २००९मधील ‘त्या’ निवडणुकीत पत्ता कापणाऱ्या श्रध्दा जाधव यांचा स्नेहल जाधव काढणार का वचपा

220
Wadala Assembly : सन २००९मधील ‘त्या’ निवडणुकीत पत्ता कापणाऱ्या श्रध्दा जाधव यांचा स्नेहल जाधव काढणार का वचपा
Wadala Assembly : सन २००९मधील ‘त्या’ निवडणुकीत पत्ता कापणाऱ्या श्रध्दा जाधव यांचा स्नेहल जाधव काढणार का वचपा
  • सचिन धानजी,मुंबई

वडाळा विधानसभा (Wadala Assembly) मतदार संघात उबाठा शिवसेनेच्या उमेदवार श्रध्दा जाधव (Shraddha Jadhav) यांचे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासमोर असून या दोघांमध्ये मनसेच्या स्नेहल जाधव (Snehal Jadhav) यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे या मतदार संघातून कोळंबकर यांच्यासमोर दोन्ही जाधवांचे आव्हान असले तरी पुन्हा एकदा श्रध्दा जाधव (Shraddha Jadhav) आणि स्नेहल जाधव (Snehal Jadhav) यांच्यातील चढाओढ पहायला मिळत आहे.

वडाळा विधानसभा (Wadala Assembly) मतदार संघातून कालिदास कोळंबकर हे निवडून येत असून तब्बल १८ वर्षांनंतर कोळंबकर यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेकडून माजी महापौर श्रध्दा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोळंबकर यांच्यासमोर श्रध्दा जाधव (Shraddha Jadhav) यांचे आव्हान निर्माण केले जात असतानाच या मतदार संघातून आता मनसेच्यावतीने माजी नगरसेविका स्नेहल जाधव (Snehal Jadhav) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकर, श्रध्दा जाधव आणि स्नेहल जाधव यांच्यामध्ये लढत पहायला मिळणार आहे.

(हेही वाचा – Veena Dev : ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन)

मात्र, श्रध्दा जाधव (Shraddha Jadhav) आणि स्नेहल जाधव (Snehal Jadhav) हे राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्य जातात. सन २००९मध्ये मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेतून स्नेहल जाधव यांचे नाव निश्वित झाले होते. परंतु रात्री अचानक चक्रे फिरली आणि सकाळी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरायला स्नेहल जाधव यांच्याऐवजी श्रध्दा जाधव निघाल्या आणि मुंबईच्या महापौर बनल्या. त्यामुळे स्नेहल जाधव यांच्या महापौर पदाचे स्वप्न हे श्रध्दा जाधव यांच्यामुळे भंग पावले गेले. महापौर पदासाठी नाव निश्चित होऊनही केवळ मातोश्रीवरुन पत्ता कापल्याने नाराज झालेल्या स्नेहल जाधव यांनी मग मनसेचा मार्ग स्वीकारुन या पक्षात प्रवेश केला. आज स्नेहल जाधव यां पक्षाच्या उपाध्यक्ष असून वडाळा विधानसभेत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच बॅनर लावून आपण याठिकाणाहून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांच्या नावाची वडाळा विधानसभेसाठी त्यांची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे महापौर पदाचे स्वप्न भंग करणाऱ्या श्रध्दा जाधव (Shraddha Jadhav) यांचा वचपा या निवडणुकीत स्नेहल जाधव (Snehal Jadhav) यांच्याकडून काढला जाण्याची शक्यता असून पुन्हा एकदा अनेक वर्षांनी या दोघींमध्ये चुरस पहायला मिळणार आहे. स्नेहल जाधव यांनी धारावी विधानसभेतून निवडणूक लढवली होती, परंतु गायकवाड यांच्या साम्राज्यापुढे त्यांचा निभाव लागला नव्हता, परंतु आता वडाळा विधानसभेतून मनसेची पूर्ण ताकद लावून कालिदास कोळंबकर यांना टक्कर देण्याचा निर्धार करत श्रध्दा जाधव यांच्यासमोर प्रमुख आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न स्नेहल जाधव यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. स्नेहल जाधव या बाहेरच्या अर्थात दादरमधील रहिवाशी असल्याने त्यांना वडाळा विधानसभेतील जनता किती स्वीकारते हा प्रश्न असला तरी मनसेचे मतदार पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याने श्रध्दा जाधव आणि स्नेहल जाधव यांच्यातील लढतीचा फायदा उचलण्यास कोळंबकर सज्ज आहेत. मात्र, श्रध्दा जाधव यांचे विभागात काम असले तरी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि त्यांचे राजकीय शत्रू हे त्यांना निवडून आणण्यात प्रयत्न करतील हा प्रश्न असल्याने श्रध्दा जाधव यांना ही निवडणूक हलक्यात घेऊनही चालणार नाही,असे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.