विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माहीम विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ४ नोव्हे. शेवटचा दिवस असेल.
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? सी-व्होटरचा सर्व्हे काय सांगतो?)
सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. तसेच अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याआधी राज ठाकरेंनी चर्चा केली असती, वेगळा निर्णय घेतला असता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी, मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे म्हणत एक अट समोर ठेवली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सदा सरवणकर (Sada Sarvankar) म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे.” असं सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community