केजरीवाल दिल्लीत निवडणूक जिंकले, पण भाजपला हरवू शकले नाहीत

114

केजरीवाल यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर नशीब आजमावून पाहिलं. परंतु जनतेने त्यांना सपशेल नाकारलं. मग ते दिल्लीत ठाण मांडून बसले. जनतेला सगळं फुकट देण्याचे वचन केजरीवाल यांनी दिले आणि त्याबदल्यात त्यांना दिल्ली व पंजाबमध्ये सत्ता स्थापन करता आली. एमसीडीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बाजी मारली. परंतु त्यांनी भाजपला हरवले असे म्हणता येणार नाही.

( हेही वाचा : बुलेट ट्रेनसाठी २२ हजार झाडे तोडा – मुंबई उच्च न्यायालय)

मला याची जाणीव आहे की निवडणुकीत एकतर विजय होतो किंवा पराभव. आप जिंकली आहे आणि भाजप हरला आहे हे सत्य स्वीकारुन वेगळ्या पद्धतीने विचार करुया, भविष्याच्या राजकारणाचा विचार करुया. एमसीडी निवडणुकीत आपला १३४ जागा मिळाल्या तर भाजपला १०४ जागा मिळाल्या. स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या लॉजिकनुसार दिल्लीमध्ये भाजपचा नैतिक विजय झाला. परंतु आपण स्वयंघोषित पुरोगामी नसल्यामुळे या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करुया.

केजरीवाल यांनी म्हटलं होतं की दिल्ली पालिकेच्या निवडणुकीत भाजपला २० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. परंतु भाजपला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. आप आता हळूहळू कॉंग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याने भाजपला नुकसान होणार नाही. दिल्लीत केजरीवालांनी पकड ढील सोडली तर पुढच्या विधानसभेत भाजप बाजी मारु शकेल. अर्थात दिल्ली विधानसभेत आपला भव्य दिव्य मतदान झालं आहे. त्यामुळे भाजपसाठी ‘आप’ला हरवणं सोपं काम नसणार.

परंतु ‘आप’ला जर २०२४ साली किंवा तिथपर्यंत पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात जाण्याची खुमखुमी आली तर मात्र त्यांच्या हातून दिल्ली हे राज्य निसटू शकतं. कारण खरं सांगायचं तर आजच्या तारखेला मोदींसमोर एकही सशक्त राष्ट्रीय नेता नाही. २०२४ ची निवडणुक राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. आणि माझ्या मते ममता बनर्जी व केजरीवाल यांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडू शकतं. कारण बनर्जी यांनी बंगालमध्ये आणि केजरीवालांनी दिल्ली व पंजाबमध्ये भाजपला रोखलं आहे. या विजयाच्या श्रेनीत राहुल गांधी कुठे म्हणजे कुठेच नाहीत. त्यात शरद पवार आता तिसरी आघाडी करणार नाहीत. त्यांना आता कळून चुकलंय की आपन पंतप्रधान होऊ शकणार नाही आणि भाजपला जर रोखायचं असेल तर सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. परंतु या सर्वांचं नेतृत्व कोण करणार हा महत्वाचा मुद्दा आहे.

राहुल यांचं नेतृत्व सगळेच स्वीकारतील याची शाश्वती नाही. तरी ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रेला इतर पक्षांनी सहकार्य केलं त्यानुसार असे वाटते की २०२४ ला आपापसात लढण्याऐवजी मोदीना हरवलं पाहिजे असा निश्चय सध्या तरी मोदी विरोधकांनी केला आहे. पण यास ममता बॅनर्जी आणि केजरीवाल अपवाद ठरतील. कारण त्यांना मोदींना हरवायचं नसून स्वतः जिंकायचं आहे असे वाटते. त्यामुळे दिल्लीतील पालिकेचे परिणाम खूप महत्वाचे ठरतात. कारण केजरीवाल जरी जिंकले असले तरी जनतेने पूर्णपणे भाजपला नाकारले नाही. त्यांनी कॉंग्रेसला नाकारले आहे एवढेच काय ते खरे! थोडक्यात, पुढचा काळ केजरीवालांसाठी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने फारसा चांगला नसेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.