शहरांमध्ये सोशल मीडियाचा अधिक प्रभाव आहे असे आपल्याला वाटते. गावातले लोक शेतीवर अवलंबून असतात. कारण शेती हा भारताचा पारंपारिक व्यवसाय आहे. आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. गावात देखील व्यवसायाच्या इतर संधी निर्माण होत आहे. इंडस्ट्रीज सुरु होत आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की भारतातले एक गाव असे आहे जिथे सोशल मीडियाची शेती केली जाते.
( हेही वाचा : दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त १४ कॅबिनेट मंत्री; कोणाचा पत्ता कट? )
होय! या गावाचे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. छत्तीसगडमध्ये नक्षलवादाची पकड आहे. आता एका वेगळ्याच चांगल्या कामासाठी छत्तीसगडची ओळख निर्माण झाली आहे. छत्तीसगडपासून ४५ किलोमीटर अंतरावर तुलसी नावाचे एक गाव आहे आणि या गावातले लोक पैशांसाठी सोशल मीडियावर अवलंबून असतात.
लहान मुले ते वृद्ध सोशल मीडियातून कमावतात पैसे
या गावातील १५ वर्षांपासून ८० वर्षांचे आजोबा देखील सोशल मीडियाचा वापर करतात. हे सर्व जण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात. या गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे आणि सुमारे एक हजाराहून अधिक लोक यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करत आहेत. ही खरंच आश्चर्याची बाब आहे.
तुलसी गावातील सोशल मीडियाचे प्रणेते
जय आणि ज्ञानेंद्र या दोन तरुणांनी सुरुवातीला हा व्यवसाय केला आणि पाहता पाहता गावातील इतर लोकांनीही असेच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. महत्वाचे म्हणजे आता YouTube वर व्हिडिओ बनवणे हा या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. लोक कॅमेरे, माईक आणि लाईट खरेदी करण्यात आपला पैसा गुंतवत आहेत.
जयने २०१६ मध्ये यूट्यूब चॅनल सुरू केले. पूर्वी जय कोचिंग क्लासमध्ये शिकवायचा. तसेच शेजारी राहणाऱ्या ज्ञानेंद्रसोबत त्याने युट्यूब चॅनलवर गंमतीदार व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. ज्ञानेंद्र हा अभियंता असून तो एसबीआय मध्ये कामाला होता.
ज्ञानेंद्र जेव्हा एसबीआयमध्ये काम करत होता तेव्हा त्यांना बँकेकडून हायस्पीड इंटरनेट मिळत होते. या माध्यमातून त्याने त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यास सुरुवात केली. दोघांनीही यूट्यूबवरून चांगली कमाई सुरू केली. या दोघांचा आता तो प्रमुख व्यवसाय झाला होता.
मग त्यांना पाहून गावचे इतर लोक देखील सोशल मीडियावर व्हिडिओ बनवू लागले. आता हळूहळू या गावात यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक इथे व्हिडिओ बनवताना दिसतात. या व्यवसायात खूप कमाई आहे असं इथल्या लोकांचं निरीक्षण आहे. तुम्ही देखील सुरुवात करुन लाखो रुपये कमवू शकता.
Join Our WhatsApp Community