जीएसटी विभागाच्या अधिका-याने मागितली लाच, सीबीआयने केली कारवाई

114

जीएसटी विभागातील भ्रष्टाचार समोर आला आहे. जीएसटी अपील विभागाच्या आयुक्ताला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. एका कंपनीच्या मालकाच्या बाजूने निकाल देण्यासाठी या अधिका-याने लाच घेतली आहे. द पवन एंटरप्राईझेस या कंपनीने एका रेल्वे प्रकल्पाचे काम केले होते. या कामाची बिले कंपनीने रेल्वेच्या उप-अभियंत्यांकडे दिल्यानंतर कंपनीच्या मालकाला या प्रकल्पासाठी 48 लाख 43 हजारांच्या जीएसटी कराची नोटीस जीएसटी विभागाने बजावली.

मागितली 10 टक्के रक्कम

या प्रकल्पासाठी झालेला आर्थिक व्यवहार हा करमुक्त असल्याचे या कंपनीच्या मालकाने जीएसटी विभागातील अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अधिकारी आपले म्हणणे ऐकत नसल्याने मालकाने जीएसटी अपील विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केली. त्यावेळी अपील विभागाचे आयुक्त राजू शक्तिवेल यांनी राजेंद्र नावाच्या आपल्या निकटवर्तीच्या माध्यमातून पवन कंपनीच्या मालकाच्या बाजूने निर्णय देण्यासाठी 48 लाखांच्या 10 टक्के रक्कम आपल्याला देण्याची मागणी केली.

(हेही वाचाः भायखळ्यातील पेट्रोल पंपावरील दरोड्याची उकल, दोघांना अटक)

सीबीआयने केली अटक

अपील प्रकरणाचा निकाल तुझ्या बाजूने देतो, फक्त त्यासाठी कराच्या रक्कमेच्या 10 टक्के रक्कम मला दे. हे पैसे मला देऊ नकोस तर माझा माणूस हवाला ऑपरेटर आहे त्याला कमिशनसहित हे पैसे दे, अशी मागणी या आयुक्ताने मालकाकडे केली. त्यानंतर या कंपनीच्या मालकाने सीबीआयमध्ये संबंधित अधिका-याची तक्रार केली. सीबीआयने मग अधिका-याच्या अटकेसाठी सापळा रचला आणि मालकाला लाच देण्यास सांगितले. ही लाच देत असताना सीबीआयने आयुक्ताला अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.