मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, पोलिसांनी जारी केले आदेश

आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होणार असल्याचा अलर्ट देण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचा अलर्ट जारी केला आहे. ड्रोन किंवा छोट्या विमानांच्या सहाय्याने मुंबईत दहशतवाद्यांकडून हल्ले होणार असल्याचे सांगण्यात येत असून,सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत.

मुंबई पोलिसांचा अलर्ट

मुंबईतील महत्वाची ठिकाणे दहशतवाद्यांच्या रडारवर नसून अतिमहत्वाच्या व्यक्तींना दहशतवादी लक्ष्य करू शकतात असे सांगण्यात येत आहे. ड्रोन उडवण्यास मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ड्रोनबाबत असलेल्या या नियमांचे उल्लंघन केल्यास आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत दोषींवर कारवाई केली जाऊ शकते, असे मुंबई पोलिसांनी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे.

(हेही वाचाः फडणवीसांचा असाही सर्जिकल स्ट्राईक…)

पोलिसांनी जारी केले आदेश

दहशतवादी आणि देशविघातक कारवाया करणारे देशद्रोही घटक ड्रोन,रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट,पॅराग्लायडरचा वापर करुन हल्ले करू शकतात. त्यामुळे खासगी हेलिकॉप्टर तसेच हॉट एअर बलूनसह इतर सर्व गोष्टींच्या वापरावर पुढील 30 दिवसांपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मुंबई पोलिसांना हवाई पाळत ठेवण्याची परवानगी आहे. 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत हा आदेश लागू असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here