सौदी अरबमध्ये स्त्रिया पहिल्यांदाच चालवणार बुलेट ट्रेन!

मुस्लिमांना कट्टरता सोडून मूळ प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना आणखी कट्टर बनवण्याचा प्रयत्न भारतात सुरु आहे. परंतु मुस्लिम राष्ट्र सौदी अरब मात्र आपल्या धोरणांत काळानुसार बदल घडवून आणत आहे. सौदी अरब हा इस्लामी देश आहे. तिथले नियम अतिशय कडक आहेत. पूर्वी महिलांवर अनेक बंधने असायची. परंतु काळाच्या ओघात आपण बदल केला पाहिजे, असं आता त्यांना वाटू लागलं आहे. म्हणूनच आता सौदी अरेबियात महिला पहिल्यांदाच बुलेट ट्रेन चालवणार आहेत. सौदी अरेबियाची रेल्वे कंपनी ‘सार’ ने ३२ सौदी महिलांना नियुक्त केले आहे.

महिलांनी ट्रेन चालवण्याची पात्रता मिळवली

महिला ट्रेन चालकांची ही पहिली तुकडी जगातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेली हार्मोनिया एक्सप्रेस चालवणार आहे. या चालकांनी आता ट्रेन चालवण्याची पात्रता मिळवली आहे. कॅप्टन मोहन्नद शाकेर यांनी या महिलांना ट्रेनिंग दिली आहे. ते म्हणाले, “हार्मिआन ट्रेन आपल्या पुरुष आणि महिला कॅप्टन्सना प्रशिक्षण देण्यासाठी उत्सूक आहेत जेणेकरून ते सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता करतील.”

(हेही वाचा मी कुठं सांगितले माझ्या काकाला ‘जाणता राजा’ म्हणा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला)

२८ हजार महिलांचे अर्ज आले होते

महत्वाची बाब म्हणजे या महिला रेल्वे चालक संपूर्ण पश्चिम आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक ठरल्या आहेत. या महिला सौदी अरेबिया, मक्का आणि मदिना या शहरांमध्ये बुलेट ट्रेन चालवणार आहेत. ही ट्रेन ४५० किमी प्रति तास ते ३०० किमी प्रति तास या वेगाने धावणार आहे. ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन असणार आहे. ही एक पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रेन आहे. ही संधी मिळाल्यानंतर महिलांना खूप आनंद झाला आहे. ही ट्रेन २०१८ मध्ये इस्लामच्या दोन पवित्र शहरांमध्ये, मक्का आणि मदिना दरम्यान सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी या नोकरीसाठी २८ हजार महिलांचे अर्ज आले होते. ही अतिशय महत्वाची बाब आहे. आपल्या देशातल्या कट्टरतावादी आणि त्यास प्रोत्साहन देणार्‍या स्वयंघोषित पुरोगाम्यांना सौदी अरबने चपराक दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here