पाकिस्तान हा अत्यंत गरीब, माजोरडा, अतिरेक्यांचा कारखाना चालवणारा देश आहे. जगात या देशाला फारशी किंमत नाही. या देशात अल्पसंख्याकांचे अधिकार पायदळी तुडवले जातात, बळजबरी धर्मांतर केले जाते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. तरी यातून एक आश्चर्यकारक बाब पाकिस्तानमध्ये दिसून येते. पाकिस्तानच्या एका गावात इतकी सुट आहे की तिथल्या महिला लग्नानंतर देखील दुसरा जीवनसाथी निवडू शकतात, इथल्या महिलांना मद्यपान करण्याची देखील मुभा आहे. अर्थात या स्वातंत्र्यामध्ये पाकिस्तानचा शून्य वाटा आहे.
या गावाचं नाव आहे ‘खैबर’ आणि हे गाव पख्तुनख्वाच्या चित्राल खोऱ्यात आहे. सुमारे ४ हजार एवढी या गावाची लोकसंख्या आहे. या गावाच्या भोवती पर्वत असल्यामुळे हे गाव पाकिस्तानी अतिरेक्यांपासून सुरक्षित असल्याचे म्हटले जाते. इथल्या जमातीला ’कलाशा’ म्हटलं जातं. जग जिंकण्याच्या इच्छेने राजा सिंकदर बाहेर पडला तेव्हा त्याचा मुक्काम या ठिकाणी होता, असे म्हटले जाते. या भागाला तेव्हापासून ‘कौकासोश इन्दिकोश’ म्हटलं जायचं, युनानी भाषेत याचा अर्थ ‘हिंदुस्थानी पर्वत’ असा होतो.
(हेही वाचा येशूचे रक्त प्या, पूजा करा म्हणत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; आळंदीत गुन्हा दाखल)
हिंदूंची परंपरा असलेले होते गाव
या गावचा इतिहास हिंदूंसाठी दुर्दैवाचा आहे. कारण ११व्या शतकात इथे मुस्लिमांकडून हिंदूंचा नरसंहार झाला होता, प्रचंड रक्तपात झाला होता. हिंदूंना काफिर ठरवण्यात आलं होतं आणि काफिरांना शिक्षा म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. या नरसंहारावरुन हिंदुकुश हे नाव या क्षेत्राला पडलं. मुस्लिम पर्यटक इब्न बतातूयाने सर्वात आधी या नावाचा उल्लेख केल्याचे म्हटले जाते. ज्यावेळेस हिंदूंचा नरसंहार झाला, त्या वेळेस अनेकांना बळजबरीने धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडलं. ज्या लोकांचं धर्म परिवर्तन झालं, ते लोक आजही त्यांच्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे हिंदू पद्धतीने पूजाविधी करतात आणि हिंदू-जीवन जगतात. इथले लोक भगवान शंकर आणि इंद्रदेवाचे भक्त आहेत. महत्वाचे म्हणजे यमदेवाची पूजा करण्याची देखील प्रथा इथे आहे. त्यांची अशी श्रद्धा आहे की, यम देव जसे प्राण घेतात, तसे प्राण देतातही. म्हणूनच इथे मृत्यू झाल्यावर कुणी रडत नाही, तर जल्लोष करतात.
महिलांना कशी आहे मोकळीक?
इथे चाओमास हा सण मोठ्या उत्सवात साजरा होतो. पारंपरिक गाणी-नृत्य करुन हा सण साजरा केला जातो. तसेच अग्नी प्रज्वलन करुन ईश्वराची उपासना केली जाते. याचा अर्थ हे लोक अग्नीपूजक देखील आहेत. इथे महिलांना मोकळीक आहे. पाकिस्तानसारख्या मागासलेल्या देशात महिलांना इतका मानसन्मान असेल असे वाटत नाही. परंतु पाकिस्तानने या जमातीकडे दुर्लक्ष केलं म्हणून ही जमात सुरक्षित आहे. परंतु आता पाकिस्तानच्या पुरुषांची नजर इथल्या महिलांवर पडू लागली आहे. इथल्या महिला उत्सवात नृत्य करताना दारुसारखे पेय पितात. या दरम्यान त्यांना एखादा पुरुष आवडला तर ते आपल्या पतीला सांगून त्या पुरुषाला आपल्या सोबत नेतात. इथे नव्या नवरीचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलं जातं. उत्सवादरम्यान एखाद्या मुलीला मुलगा आवडला तर ती त्या मुलासोबत त्याच्या घरी जाते. मग द्राक्षाच्या दारुचे सेवन करत ही आमच्या घरची सून आहे असे घोषित केले जाते. इथली संस्कृती जुनी वाटत असली तरी अत्यंत आधुनिकही वाटते. पण या महिलांचे आणि इथल्या समुदायाचे रक्षण पाकिस्तानच्या विचित्र गजरेपासून कसे होईल, हाच भविष्याला सतावणारा प्रश्न आहे.
(हेही वाचा नववर्षात घ्या हक्काचे घर! म्हाडाकडून ५९९० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर)