नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ही एक अमेरिकन अंतराळ संस्था आहे. नासा अंतराळ संस्था विश्वाची उत्पत्ती, नवीन ग्रहांचा शोध यासारखी कार्ये करते. नासाचे मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका येथे आहे. नासा ही जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. सध्या जगभरातील सुमारे १८००० कर्मचारी नासामध्ये कार्यरत आहेत आणि महत्वाचे म्हणजे नासातील ३६ % शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. नासाची स्थापना १९५८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपति ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी केली होती. पूर्वी नासाचे नाव “नॅशनल ऍडव्हायजर कमिटी फॉर एरोनॉटिक्स असे होते.
( हेही वाचा : बिबट्याचा वावर असलेल्या जंगलात जी-२० च्या सदस्यांसाठी नियमांची पायमल्ली… पहा कुठे घडला प्रकार)
आता नासा ही प्रतिष्ठित संस्था आहे. नासाने चंद्र मोहीम यशस्वी करुन दाखवलीच आहे. आता मंगळ ग्रहावरील मोहिमेवर नासाचं लक्ष आहे. ही अतिशयोक्ती ठरेल परंतु काही वर्षांनी मंगळग्रहावर माणसे जाऊ शकतील. पण आता एक वेगळीच बातमी हाती लागली आहे. नासाची इच्छा आहे की मंगळ मोहिमेवर महिलांनीच जायला हवे. यामगील कारण गंमतीदार वाटत असलं तरी महत्वाचे आहे.
काही वर्षांपूर्वी एक गुप्तचर अहवाल समोर आला होता. या अहवालानुसार सध्या अंतराळात महिला केवळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत जातात. आता त्यांना यापुढेही जाता येणार आहे, पण एकटीनेच. याचे कारण या अहवालात आहे. २०१७ ची गोष्ट. ब्रिटिश अंतराळवीर हेलन शरमन यांनी एका सभेला संबोधित करताना असं म्हटलं होतं की नासाच्या अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की मंगळाच्या प्रवासासाठी लागणार्या दीड वर्षांच्या कालावधीत स्त्री व पुरुष उत्तेजित होऊ शकतात. त्यांनी असेही सांगितले की तो अहवाल कधी प्रसिद्ध झाला नव्हता. खरं तर अहवालात असं म्हटलं होतं की महिला ह्या एक टीम म्हणून अधिक योग्य प्रकारे कामगिरी बजावतात. त्यामुळे महिलांचा क्रू हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.
परंतु आणखी एक कारण म्हणजे पृथ्वीवरुन मंगळग्रहापर्यंत पोहोचायला दीड वर्षांचा कालावधी लागतो. लांबच्या प्रवासात अंतराळवीर उच्च किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ शकतात. या दरम्यान जर दोन अंतराळवीर उत्तेजित झाले आणि महिला गरोदर राहिली तर या किरणोत्सर्गाचा मुलावर कसा विपरित परिणाम होईल हे अजून शास्त्रज्ञांना ज्ञात नाही. म्हणून केवळ महिलांच्याच टीमने प्रवास करावा असा विचार सध्या सुरु आहे.
Join Our WhatsApp Community