‘या’ शहरात रात्र वै-याची आहे, पोलिसांनी नोंदवली सर्वाधिक अपघाती मृत्यूंची संख्या

226

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच, शहरी भागासह राज्यातील अपघातांच्या संख्येतील वाढीबाबत ग्रामीण पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेल्या सर्व्हेनुसार, रात्री 8 ते 12 पर्यंत मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस अपघाती मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे यामागचे कारण शोधून काढण्यासाठी आणि अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक सर्व्हे केला आहे.

(हेही वाचाः सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ‘ही’ सोपी ट्रिक वापरा आणि ओळखा)

अपघाती मृत्यूंची संख्या जास्त

या सर्व्हेनुसार, दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत होणा-या अपघातांची संख्या जास्त असून, रात्री 8 ते 12 या वेळेत अपघाती मृत्यूंची संख्या जास्त असल्याचे समोर येत आहे. तसेच रात्री कामावरुन घरी परत येणारे,चुकीच्या मार्गाने गाडी चालवणारे,दारु पिऊन गाडी चालवणे यामुळे सर्वाधिक अपघात होत असल्याचे या सर्व्हेतून समोर येत आहे.

आयुक्तांनी दिली माहिती

केंद्रीय मंत्री भारती पवार आणि नाशिक शहराचे खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संसदीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हा सर्व्हे सादर केला. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणा-या विविध उपाययोजनांची माहिती देखील यावेळी आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः राज्यात 39 लाख विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि पुस्तके मिळण्यात येणार अडचण? काय आहे कारण)

नाशिक ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, नाशिक ग्रामीणमध्ये यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत 1 हजार 197 रस्ते अपघात झाले आहेत. यापैकी 357 अपघात संध्याकाळी 4 ते 8, तर 233 अपघात रात्री 8 ते मध्यरात्रीपर्यंत घडले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.