नापास राहुल गांधींना निवृत्त करा!

178

कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने जातीयवादी विधान केल्यामुळे आणि मोदी या आडनावाच्या प्रत्येक व्यक्तीला चोर म्हटल्यामुळे दोन वर्षांची शिक्षा दिली आहे. याआधी काहीवेळा राहुल यांनी माफी मागितली होती. मात्र यावेळी त्यांनी माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याचा अर्थ आता कदाचित माफी मागण्यासाठी संवैधानिक मार्ग उरलेला नाही असा होऊ शकतो.

माय-लेकांनी कॉंग्रेससारख्या मोठ्या राजकीय पक्षाचे वाटोळे केले

सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि कॉंग्रेसचा एका कुटुंबाच्या गोठ्यात बांधलेला बैल झाला. त्यानंतर मात्र कॉंग्रेसला उतरती कळा लागली. याच काळात कॉंग्रेसवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मनमोहन सिंह यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि उच्च विद्याविभूषित व्यक्तीला बाहुले करुन ठेवले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना त्यांना दिलेली वागणूक असो किंवा अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करायला गेलेल्या हिमंता बिस्व सर्मा या हिर्‍याकडे केलेले दुर्लक्ष असो या अशा अनेक कारणांमुळे हे सिद्ध होतं की या माय-लेकांनी मिळून कॉंग्रेससारख्या मोठ्या राजकीय पक्षाचे वाटोळे केले.

राहुल निवडणूक जिंकून देऊ शकत नाही

पण कॉंग्रेस पक्ष या माय-लेकाला पूर्णपणे शरण गेला आहे. आणि त्यातून बाहेर पडण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. राहुल गांधी म्हणजे नापास होणारे ते पोर आहे, जे अंगुठा छाप असून सुशिक्षित, उच्चशिक्षित लोकांवर राज्य करते. अशा घटना आपण हिंदी चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. आता हीच वेळ आहे कॉंग्रेसने जरा बळ एकवटून या माय-लेकाला पक्षापासून दूर ठेवले पाहिजे. राहुल निवडणूक जिंकून देऊ शकत नाही आणि जनाधारही मिळवून देऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

त्यामुळे नापास होणार्‍या आणि म्हातारपणाकडे वाटचाल करणार्‍या बुद्धीने अजूनही बाळ असणार्‍या या अद्भूत बाप्याला निवृत्त करण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेसला जर टिकून राहायचे असेल तर राहुल गांधींना निवृत्त करावे लागेल. हवेतर त्यांना पेन्शन सुरू करा, फॉरेनला फिरण्यासाठी आणि ते जे काही ग्रहण करतात त्यासाठी. मात्र आता जर त्यांना निवृत्त केले नाही तर कॉंग्रेस नावाची ही कंपनी डबघाईला जाईल.

(हेही वाचा – राहुल गांधींची सजा, कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मजा आणि भाजपची मज्जाच मज्जा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.