कोरोनाबद्दलच्या चर्चा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. कोरोनासह आणखी इतर व्हायरल आजार देखील आले आहेत. तरी हे इतर आजार धोकादायक असल्याचे कुणी सांगितलेले नाही. परंतु कोरोनाचे नाव ऐकूनच लोकांमध्ये भीती पसरते. त्यात सोशल मीडियावर अफवा पसरवून घाबरवणारे अनेक आहेत. आता काळजी म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मास्कचा वापर करावा लागणार आहे. कोविडचे सगळे नियम पुन्हा एकदा पाळावे लागणार आहेत.
( हेही वाचा : मुंबई पुन्हा अलर्टवर! विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना तपासणी सुरु)
आता या पार्श्वभूमीवर एक अद्भूत उत्पादन मार्केटमध्ये आले आहे. हे उत्पादन म्हणजे मास्क. परंतु हा मास्क सर्वसामान्य नसून फारच वेगळा आहे. एलजी प्युरीकेअर व्हेअरेबल अएर प्युरिफायर असे या मास्कचे नाव असून हा मास्क बिल्ट इन एअर प्युरिफायरसोबत उपलब्ध आहे. याचा खूप मोठा फायदा आहे. यामुळे तुम्हाला प्रदूषण, बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून उत्तम संरक्षण प्राप्त होते.
या मास्कची खासियत अशी आहे की एअर प्युरिफिकेशनसह येणारा हा मास्क एच१३ एचईपीए फिल्टरने सुसज्ज आहे, जो प्रदूषक आणि व्हायरस-बॅक्टेरियाला दूर ठेवतो. जर तुम्हाला वारंवार बाहेर जावं लागत असेल तर हा मास्क तुम्हाला सुरक्षा देतो. महत्वाचे म्हणजे मास्क खूपच हलका आहे आणि ब्लूटूथच्या मदतीने मास्क स्मार्टफोनशी कनेक्ट होऊ शकतो.
या मास्कमध्ये ड्युअल इन्व्हर्टर फॅन बसवले आहेत. हे पेटंटेड रेस्पिरेटरी सेन्सरसह येते, म्हणजे तुम्ही श्वास घेता तेव्हा हे सक्रिय होतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बिल्ट इन माइक आहे जो तुमचा आवाज बाहेरून फेकतो. बर्याचदा सामान्य मास्कमध्ये मास्क घातल्यावर आपला आवाज अस्पष्ट ऐकू यायचा किंवा ऐकू यायचाच नाही. या मास्कमुळे ही चिंता देखील मिटणार आहे. हा मास्क जरा महाग असला तरी खूपच उपयुक्त आहे.
Join Our WhatsApp Community