भारतीय रेल्वेचा आपल्या प्रवाशांना कायमंच उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न राहिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन सुविधा देत रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे काम भारतीय रेल्वे सक्षमरित्या करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय रेल्वेने कल्पकतेची एक वेगळीच ‘उंची’ गाठली आहे. तब्बल 359 मी. उंचावर रेल्वे ब्रीज बंधण्यात येत असून, हा जगातील सर्वात उंच पूल म्हणून ओळखला जाणार आहे. हा विक्रम करत भारतीय रेल्वेने जगात देशाची मान उंचावली आहे.
आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर हा कमानी पूल(Arch Bridge) उभारण्यात आला आहे. तब्बल 359 मी.(1 हजार फूट) उंचावर असलेल्या पुलाची लांबी 1.3 किमी. आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही हा पूल 30 मी. उंच आहे. असे वैशिष्ट्य असणारा हा जगातील पहिलाच पूल ठरला आहे.
(हेही वाचाः अरे वाह! आता लवकरच वापरु शकाल 5G नेटवर्क!)
पर्यटनासाठी होणार फायदा
काश्मीर खो-याला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने या पुलाचे बांधकाम 2004 मध्ये सुरू करण्यात आले. उत्तर रेल्वेने निर्देशित केलेल्या या पुलाच्या प्रकल्पाला 2002 मध्ये राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना मोठा फायदा होणार असून, पर्यटनाचाही चांगला विकास होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर एक या पुलाचा फोटो शेअर करत जगातील सर्वात उंच पूल असल्याचे म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या पुलाच्या स्ट्रक्चरल डिटेलिंगसाठी टेकला या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामात स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हे स्टील 10 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस तापमानासाठी योग्य असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः हवी होती माफी पण खावी लागली पोलिसांची लाठी!)
Join Our WhatsApp CommunityThe world's highest #arch #ChenabBridge over the clouds. pic.twitter.com/0fkKFc4Nte
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 7, 2022