अहमदाबाद महापालिकेने अटल पूल बांधला आहे. पंतप्रधान मोदी २७ व २८ ऑगस्टला गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत.
आकर्षक डिझाईन आणि एलईडी लाइटिंगने हा पूल सुसज्ज आहे. हा पूल सुमारे ३०० मीटर लांब आणि १४ मीटर रूंद आहे.
मुंबईच्या STUP कन्सल्टंट्स लिमिटेड आणि पीआर इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड कंपनीने पूलचे बांधकाम केले आहे.
पादचाऱ्यांशिवाय सायकलस्वारही नदी ओलांडण्यासाठी या पुलाचा वापरू करू शकतात.