पारतंत्र्यातून भारताची सुटका करण्यासाठी चले जाव चळवळ आणि त्यासारख्या असंख्य गोष्टींमधून मुंबईने मोलाचे योगदान दिले होते. जाज्वल्य देश भावना जागृत करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुंबई अग्रभागी राहिली होती. त्यामुळे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुंबईतील प्रत्येक घरात, प्रत्येक परिसरात आणि प्रत्येक मुंबईकराला सहभागी करून घेऊन साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागील महिनाभर अथक प्रयत्न केले आहेत. त्याचा परिपाक म्हणून आज संपूर्ण मुंबई महानगर तिरंगा रंगात आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उत्साहात न्हाऊन निघाले आहे. मुंबईतल्या गगनभरारी घेणाऱ्या उंच इमारतींवर अभिमानाने झळकणारा राष्ट्रध्वज तिरंगा प्रत्येक चाळीत आणि झोपडपट्टी बहुल परिसरातील प्रत्येक घरावर देखील तितक्याच अभिमानाने फडकतो आहे. यामागे असणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांची सफलता दर्शवणारी ही बोलकी छायाचित्रे…!
(हेही वाचा वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे बळी ठरले विनायक मेटे?)
Join Our WhatsApp Community