‘बाणगंगा’ परिसर मुंबईतील नवे पर्यटनस्थळ; पहा सुंदर फोटो

वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला पर्यटनस्थळ हा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाणगंगा या ठिकाणाचे महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे. याठिकाणी तरुणाई फोटो काढण्यासाठी गर्दी करते.

( हेही वाचा : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील RAC सुविधा केली बंद; आता फक्त कन्फर्म तिकिटावरच करा प्रवास )

बाणगंगा हे मलबार हिल टेकडीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले हे एक गोड्या पाण्याचे कुंड आहे.

आजूबाजूला समुद्र असतानाही हे मध्यभागी असलेले गोड्या पाण्याचे कुंड विशेष आकर्षण आहे.

तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा आणि मठ आहे.

तलावाच्या काठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

तलावाला लागून व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा व वाळकेश्वर मंदिर आहे. या तलावाला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकताच पर्यटन विभागाकडे सादर केला होता. बाणगंगा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे कामही पालिकेच्या विभाग कार्यलयामार्फत सुरू करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here