बेस्टच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल, पहा फोटो

154

भारतातील व बेस्ट उपक्रमातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बस बेस्ट उपक्रमात सोमवारी १३ फेब्रुवारीला ताफ्यात दाखल झाली असून सदर बसचे उद्घाटन बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक तथा प्रशासक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते कुलाबा आगार येथे संपन्न झाले.

New Project 6 4

या प्रसंगी उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर डबल डेक बस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

  New Project 3 6

साधारणत: पुढील आठवड्यापासून ही बस प्रवाशांच्या सेवेत येईल ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गावर धावणार आहे. या डबलडेकर बसमधून एकाचवेळी ७६ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

New Project 4 4 या नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यामध्ये दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.