स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण स्मृतिवर्षानिमित्ताने रक्तदान शिबिर; ५५ बाटल्या रक्त संकलन

249

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण स्मृतिवर्षानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि श्री हनुमान सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात दिवसभरात रक्ताच्या ५५ बाटल्या जमा झाल्या. गेल्यावर्षी रक्तदान शिबिरात ४२ बाटल्या जमल्या होत्या. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या व्यवस्थापक संजय चेंदवणकर, स्मारकाचे विश्वस्त कमलाकर गुरव, जयश्री पोरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. तर श्री हनुमान मंदिर ट्रस्टकडून संदीप सकपाळ, सागर सकपाळ, कुणाल मोरे, अजित बांद्रे आणि कार्यकर्ते यांनी या रक्तदान शिबिरासाठी योगदान दिले. रक्तदान शिबिरात २ महिलांनीही रक्तदान केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.