ब्रेक दि चेनः रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट!

ब्रेक दि चेन मोहिमेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर लॉकडाऊन ही एकमेव ढाल असल्याने, राज्य सरकराने राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या लॉकडाऊनबाबत लोकांची चांगली, वाईट अशी दोन्ही मते आहेत. पण कोरोनाच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्यातील जनता सरकारच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. वर्क फ्रॉम होममुळे सध्या रेल्वे स्थानकांसह लोकलमधील गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here