
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्युटला भेट दिली आहे. झपाट्याने वाढणा-या कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लसीकरणासाठी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हाफकिन इन्स्टिट्युटला लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुद्धा केली होती.