राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नाशिक महापालिका यांच्यावतीने नाशिक येथे कोविड केअर सेंटर

कोविड वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांना सेवेत रुजू होण्याआधी 2 दिवस गुरुजी रुग्णालयातर्फे रुग्णांना हाताळण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुर्वेद सेवा संघ यांच्या सहकार्याने संचलित नाशिक येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे रुग्णांना निवास, भोजन, सुरक्षा दिल्या जातात. त्यासाठी गरजेनुसार प्रत्येकी 2 ते 8 स्वयंसेवक कार्यरत असतात. साधारण एकावेळी 10 स्वयंसेवक आळीपाळीने काम करतात आणि एकूण साधारण 25 जण तिथे कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here