1 of 6

मुंबईच्या पर्यटनात आणखी एका पर्यटन स्थळाची भर पडली आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना गुढी पाडव्याला हे पर्यटन स्थळ गिफ्ट मिळाले असून येथील निसर्गाच्या सानिध्यात नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. (Elevated Nature Trail)

मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी देखील याठिकाणी मिळणार आहे. 700 मिटर लांबी असलेल्या नेचर वॉक वे साठी तिकीट असणार आहे. (Elevated Nature Trail)

दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय 'निसर्ग उन्नत मार्ग' (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) च्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. (Elevated Nature Trail)

निसर्ग उन्नत मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे. (Elevated Nature Trail)