स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर भारताच्या स्वातंत्र्यदिनी सकाळी दिमाखाl राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख ब्रिगेडियर सलभ सोनल यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर तसेच स्मारकाच्या विविध उपक्रमाचे पदाधिकारी, सावरकर स्मारकाचे सदस्य कर्मचारी उपस्थित होते. ब्रिगेडियर सोनल यांच्यासोबत लष्कराच्या विशेष दलाचे अधिकारी मेजर ए. एस. बैन्स हे ही उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सावरकर स्मारकासारख्या एका महत्त्वपूर्ण वास्तूत आपण आलो, याबद्दल समाधान व्यक्त करत सोनल यांनी भारतीय लष्कराच्या मागे आपण सारे भारतीय आहात ही प्रेरणा महत्वाची आहे. तसेच प्रत्येक नागरिक हा ही एक सोल्जर आहे, त्याचे महत्त्वही आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे प्रमुख ब्रिगेडियर सलभ सोनल. बाजूला सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, मेजर ए. एस. बैन्स, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर आणि अन्य.
Join Our WhatsApp Community