‘वंदे भारत’ ट्रेनने जगातील सर्वांत वेगवान रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे.अहमदाबाद ते
मुंबई दरम्यानचे 492 किमी अंतर ‘वंदे भारत’ने अवघ्या पाच तासांमध्येच कापले.
गवान प्रवास करण्यासाठी आणि वंदे भारतच्या प्रवासी भाड्याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतमधील एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी प्रवाशांना 2 हजार 349 रूपये भाडं लागणार आहे. तर चेअर कारचे मूळ भाडं 1 हजार 144 रूपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामध्ये जीएसटीचा समावेश नसल्याचीही माहिती आहे.
मुंबई सेंट्रलवरून ही गाडी दररोज सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि गांधी नगर स्थानकात दुपारी 12.30 पर्यंत पोचेल,
तर त्याच दिवशी दुपारी गांधी नगर येथून 2.05 ला सुटून संध्याकाळी 8.35 ला मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचेल.
वंदे भारत एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये
० ते १६० kmph फक्त १२९ सेकंदात
अॅडव्हान्स फायर डिटेक्शन सिस्टीम
डब्यातील जंतूंचा नाश करणारी आणि हवा शुद्ध करणारी यंत्रणा
Join Our WhatsApp Community