दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षी मोठ्या धामधुमीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा गणपतीच्या मूर्तींच्या उंचीवर मर्यादा नाही. त्यामुळे साहजिकच मुंबईत यंदा गणपती बाप्पाच्या उंचच उंच मूर्ती पाहायला मिळणार आहेत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे त्यांच्या गणेश मूर्ती गणेशचतुर्थीच्या एक आठवडा आधी मंडपात आणून ठेवतात. त्यानुसार रविवार, २१ ऑगस्ट रोजी सुटीचा दिवस लक्षात घेऊन बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी त्यांच्या गणेश मूर्ती रविवारीच गणपती कारखान्यातून मंडपात आणल्या, तेव्हा रस्त्यांवर अनेकांच्या नजरा या गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत होत्या.
Join Our WhatsApp Community