आमदार गोपीचंद पडळकरांची वीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूरला भेट

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूर येथील वीर सावरकर स्मारकाला भेट दिली. यावेळी आमदार पडळकर प्रतिक्रिया देताना म्हणाले, जिथे जिथे संधी मिळेल, तिथे वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार आहे. भारताला दिशा देणाऱ्या, भारताला सशक्त करण्याची कामगिरी करणाऱ्या वीर सावरकरांना अभिवादन करून ऊर्जा मिळाली. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसचे लोक वीर सावरकरांवर कायम टीका करतात. त्यांनी कसल्याही पद्धतीचे घाणेरडे राजकारण केले, तरी वीर सावरकर प्रेमी काम करत आहेत. काँग्रेसकडून महापुरुषांचा कायमच अपमान होत आहे. सूर्यावर थुंकण्याचा काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. राज्यात आमच्या विचारांचे सरकार आहे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here