कोरोना काळात मदतकार्य करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार 

 

कोरोना संसर्ग तसेच निसर्ग वादळाच्या काळात जनसामान्यांसाठी उल्लेखनीय मदतकार्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र, मुंबई, एमव्हीआयआरडीसी, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आदी संथांच्या प्रतिनिधींचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. उझबेकीस्तानचे मानद वाणिज्यदूत विजय कलंत्री, जागतिक व्यापार केंद्र मुंबईचे कार्य. संचालक वाय.आर. वरेरकर, वरिष्ठ संचालिका रूपा नाईक, उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, संगीता जैन, विशाल कलंत्री, राजश्री कोळेकर आदींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

(हेही वाचा : पशुपक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राजभवनात सत्कार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here