1 of 8

दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. (Holi 2025)

माघ महिना संपतात ऋतुंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होतं. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असं म्हणतात, तर कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. (Holi 2025)

चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावी होळीसाठी 'व्होल्टे होम' नावाचा एक अनोखा खेळ खेळला जातो, ज्यात जळलेली लाकडं एकमेकांवर फेकली जातात. मात्र याचे विशेष असे की, यात कोणालाही इजा होत नाही. (Holi 2025)