“बुरा न मानो होली है”…देशभरात धुळवडीचा उत्साह, पहा क्षणचित्रे

कोरोनानंतर तब्बल दोनवर्षांनी निर्बंधमुक्त धुळवड साजरी करण्याला परवानगी असल्याने संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण रंगपंचमी खेळत आहेत. दरम्यान, धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा : चीनच्या कुरापती सुरूच…मोबाईलद्वारे हेरगिरी! भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा)

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात पोलीस यंत्रणाही विशेष खबरदारी घेत आहेत. जागोजागी महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असून ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी सुद्धा सुरू करण्यात आली आहे.

विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यंदा कोणतेच निर्बंध नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.

रिसॉर्टचे ७० ते ८० टक्के बुकींग पूर्ण झाले असून, अनेक हॉटेल्समध्ये होळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिकडचा तरूणवर्ग अशा धुलिवंदन इव्हेंटला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतो.

वृंदावनमधील अनेक व्हिडिओ सध्या ट्विटरसह अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here