भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असे महाकालेश्वर मंदिर उज्जैनमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या कॉरिडॉरचे उद्घाटन झाले. या कॉरिडॉरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम २०२३-२४ पर्यंत पूर्ण होईल.
( हेही वाचा : कोकणातील संगमेश्वर रेल्वेस्थानकातील फलाटाची दुरवस्था; प्रवाशांची गैरसोय)
महाकाल कॉरिडॉरमुळे धर्मनगरी उज्जैनला नवी ओळख मिळणार आहे.
महाकालेश्वर मंदिराच्या महाकाल प्रांगणात विविध कथा दर्शविणारी शिल्प बसवण्यात आली आहेत. याच प्रांगणात लहान -मोठ्या अशा सुमारे २०० मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
महाकाल प्रांगणात १०८ खांब तयार करण्यात आले आहेत. यावर भगवान भोलेनाथ आणि शक्ती यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. या महाकाल प्रांगणात बसवलेली शिल्पांसमोर क्यू आर कोड बसवण्यात आले आहेत ही कोड स्कॅन केल्यावर ही शिल्पे त्यांचीच कहाणी सांगणार आहेत.
Join Our WhatsApp Community