देशातील पहिले ‘नाईट स्काय अभयारण्य’!

देशातील पहिले नाईट स्काय अभयारण्य लडाखमध्ये उभारण्यात येत आहे. हे अभयारण्य लडाखमधील हेन्ली येथील थंड वाळवंटात उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली. हे देशातील पहिले नाईट स्काय अभयारण्य असेल.

नाईट स्काय सॅंच्युअरी म्हणजे अभयारण्य जिथे मोकळ्या आकाशात चांदण्या पाहता येतात, येथे प्रकाश नसतो.

लडाखमधील हेन्ली हे नाईट स्काय सॅंच्युअरीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे जास्त लोकांची गर्दी नसते तसेच संपूर्ण आकाश निरभ्र आणि कोरडे हवामान असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here