सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी नागरी क्षेत्रातील यंत्रणा अपुरी पडत असल्याने आता सैन्यातील तिन्ही दल नागरी क्षेत्राच्या मदतीसाठी धावून आले आहे. यात देशातील भूदलाच्या काँटेन्मेंट झोनमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे, तर नौदलाच्या पश्चिमी विभागाच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये नागरी क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आता वायू दलाची विमाने परदेशातून ऑक्सिजन काँसंट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर, अत्यावश्यक औषधे, कोरोनासंबंधी आवश्यक वस्तू देशात आणून त्या देशातील अन्य राज्यांत पोहचवण्याचे महत्वाचे काम करत आहे. वायू दलाने आतापर्यंत बँकॉक, सिंगापूर, इस्राईल या देशांमधून हे साहित्य देशात आणले आहे आणि ते देशातील अन्य राज्यांमध्ये वितरित केले. त्यामुळे राज्यांना हे साहित्य कमी वेळात प्राप्त होत आहे.
Join Our WhatsApp Community