मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीसाठी निघालेली मंगलम कार्गो शिप सकाळी साडे सातच्या सुमारास रेवदंडा खाडीमध्ये बुडाली. या जहाजावरील 16 खलाशांना भारतीय तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले आहेत.
बचावलेल्या खलाशांमध्ये कॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके यांचा समावेश आहे.
गुरुवारी, 17 जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एम.व्ही. मंगलम ही बार्ज मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघालेली होती. हा बार्ज रेवदंडा खाडीमध्ये बुडाल्याची घटना घडली. या बार्जमधील 16 खलाशांना वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे. #IndianCoastGuard #Raigad pic.twitter.com/ERcPZg9Lae
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 17, 2021
Join Our WhatsApp Community